मी-पाहिलेली-सर्कस
  मी पाहिलेली सर्कस

मी पाहिलेली सर्कस | Mi Pahileli Circus Marathi Nibandh :-मे महिन्याच्या सुट्ट्या मध्ये बाबांनी आम्हाला रॉयल सर्कस नावाची सर्कस पाहायला नेली होते. मोकळ्या मैदानावर सरकारचा मोठा तंबू लावलेला होता. बँड वाजू लागल्यावर चकचकीत पोशाख केलेली मुले मुली रांगेत येऊन प्रेक्षकांना अभिवादन करू लागली. रिंग मास्टर नि मग वाघ, वगैरे प्राण्यांची पिंजरे आणले. एकेक  वाघ, सिंह रिंग मास्टर ने सांगितल्याप्रमाणे स्टुलावर पाय ठेवुन सलाम करू लागला.

रंगबिरंगी पोषाख केलेले लिंबू विदेशात मध्येच कोलांट्या उड्या मारीत एकमेकांच्या खोड्या करत होते. त्यांचे हावभाव पाहून सर्वजण खो खो हसत होते. इतक्यात अस्वले सायकल चालवता आली.   बांधलेल्या दोन हत्तींनी एकमेकांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या.

उंच झुल्यावर सर्कस सुंदरी सहजपणे कोलांट्या मारत या झुल यावरून त्या झुल्यावर जात होत्या. सर्व प्रेक्षक श्वास रोखून हा खेळ पाहत होते. सर्कस पाहता-पाहता दोन-तीन तास कधी संपली ते आम्हाला कळलेच नाही. घरी परततांना अजूनही माझ्या कानात वागण्याच्या डरकाळ्या घुमत होत्या.