रेल्वे-स्टेशन-वर-मराठी-निबंध
रेल्वे-स्टेशन-वर-मराठी-निबंध

एकदा आम्ही पुण्याला जाण्यासाठी रेल्वे निघालो होतो गाडी यायला खूपच वेळ होता म्हणून आम्ही फलाटावर गाडी ची वाट पाहत बसलो. फलाटावर एका बाजूला खाण्याच्या पदार्थाचे दुकान होते. वर्तमानपत्रे, लहान मोठी पुस्तके, मासिके हे दुकान होते. येथे खूपच गर्दी होती. समोरच्या फलाटावर लोकल गाड्यांची ये-जा सुरू होती. लोकलमध्ये पडणाऱ्या उतरणाऱ्या लोकांची खुपच घाई चालू होती. गाडीमध्ये बसायला जागा मिळवण्यासाठी प्रत्येक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता.

पलीकडच्या रुळावर लांबच्या गावाला जाणारी गाडी आली होती, लाल रंगाचे कपडे घातलेले हमाल मोठ-मोठ्या  बॅगा, सामान घेऊन धावत होते व प्रवाशांना सामान गाडीमध्ये चढुन देत होते. समोरच्या रुळावरुन एक मोठी मालगाडी चालली होती.फलकावर ठिकाणी जाहिरातीचे बोर्ड लावले होते.  मधेच  एखांदा विक्रेता जोरात लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ओरडत होता. स्टेशनवरील या सर्व गडबडीची मला खूपच मजा वाटत होती