संगणकावर-मराठी-निबंध
संगणकावर-मराठी-निबंध

संगणकावर मराठी निबंध | Sanganak Marathi Nibandh :
मला संगणक खूप आवडतो. संगणकावर खूप छान छान खेळ खेळता येतात. मी संगणकावर खेळतो. एकदा ताईने मला संगणकाच्या खूप गमती दाखवल्या. संगणकावर आपला मजकूर टंकलिखित करता येतो. त्यात हव्या त्या दुरुस्त्या करता येतात. अक्षरांचे आकार लहान मोठे करता येतात. संगणकावर कोणती आकृती अचूक काढता येते. चित्र काढता येतात. त्यात रंग भरता येतात. गणिते सोडवता येतात. संगणक हिशोब ठेवू शकतो. या सर्व गोष्टी संगणकावर भरभर व अचूक करता येतात. इंटरनेट मुळे आपल्याला हवी ती माहिती संगणकावर मिळवता येते. संगणकाद्वारे मित्रांशी गप्पा मारता येतात. हल्ली संगणकावर विमानाची व गाड्यांची तिकीटही मिळतात. संगणकाचे फायदे सांगावे तेवढे थोडेच आहेत. संगणक हा खरोखरच आपला मित्र आहे.