Shahu Maharaj Information Marathi : राजश्री शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे अधिपती होते. प्रजा वत्सल, दलित बंधू, समतेचे पुरस्कर्ते, अभ्युदया विषयी सर्वांगी दृष्टी असलेले, निधड्या वृत्तीचे समाज सुधारक होते.शाहू महाराजांच्या जीवनातील संक्षिप्त घटनाक्रम :-

जन्म : २६ जून १८७४

जन्मस्थळ : कागल

वडिलांचे नाव : जयसिंगराव( आबा साहेब) घाटगे ,

आईचे नाव : राधाबाई

बालपणीचे नाव : यशवंतराव

धाकट्या भावाचे नाव : श्रीमंत बापूसाहेब महाराज ( कागल) वयाच्या तिसऱ्या वर्षी निधन

१७ मार्च १८८४ : शाहू महाराजांचे दत्तक विधान व राज्यारोहण झाले. पोलिटिकल एजंट कर्नल एच ए रिवज व मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्गसन यांनी दत्तक विधानास संमती दिली. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर शाहू महाराज असे नामकरण झाले . शाहू महाराज दोन दैवतांना खूप मानत असायचे

१) छत्रपती शिवाजी महाराज

२) कोल्हापूर राजाच्या संस्थापिका महाराणी ताराबाई

२० मार्च १८८६ मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

१८८५ ते १८८९ : राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये प्रशिक्षण. प्राथमिक शिक्षक के बी गोखले व एच बी गोखले

८ मे १८८८ : मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामात शाहूंच्या हस्ते प्रारंभ

१८८८ : करवीर दरबाराचे गॅझेट प्रसिद्ध.

१८८९ ते १८९३ : धारवाड येथे एस एम फेझर यांच्या देखरेखीखाली अध्ययन

१ एप्रिल १८९१ : लक्ष्मीबाई गुणाजी राव खानविलकर बडोदा यांच्याशी विवाह

२० एप्रिल १८९१ : लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते रेल्वे सुरू

१८९३ : कोल्हापूर सरकारने कायदे पुस्तक छापले.

३ एप्रिल १८९३ : शाहू महाराजांच्या हस्ते राजाराम कॉलेजमध्ये बक्षीस समारंभ

२ एप्रिल १८९४ : राज्यारोहण समारंभ मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरीस यांच्या हस्ते झाला. आर जी भंडारकर, गो ग आगरकर, जेके गोखले राज्य रोहन प्रसंगी उपस्थित.

३ एप्रिल १८९४ : टिळकांनी केसरीत ' करवीर क्षेत्री राजकीय कपिलाषष्ठीचा योग' हा महाराजांचा अभिष्टचिंतन करणारा लेख लिहला. मेजर दादासाहेब निंबाळकर यांनी समाजाच्या १९७६ रोप्य महोत्सव अंकात ' श्री शाहू महाराज व ऋणानुबंध' हा लेख लिहिला

१ जानेवारी १८९५ : ब्रिटनची सम्राज्ञी महाराणी व्हिक्टोरिया यांनी शाहू महाराजांना जी सी आय एस हा किताब अर्पण केला. हा किताब त्यांना १८ सप्टेंबर १८९५ रोजी लॉर्ड सेंडहर्स्ट यांच्या हस्ते देण्यात आला.

२८ मार्च १८९५ : फरगुशन कॉलेज इमारतीचे उद्घाटन

१८९७ : दुष्काळी कामे, शेतकऱ्यांना तगाई, स्वस्त धान्य दुकाने स्थापन. महारोग यांसाठी उसगाव येथे आश्रम सुरू केला. त्यांना विक्टोरिया राणीचे नाव दिले. १९१० पर्यंत डॉक्टर वानलेस व नंतर डॉक्टर व्हेल फॅमिली डॉक्टर होते.

१८९८ ते १९०१ : ताईमहाराज प्रकरण

१९०० ते १९०१ : वेदोक्त चळवळ, सिद्धांत विजय ग्रंथ

२४ में १९०० : विक्टोरिया राणीने शाहू छत्रपतींना महाराज ही पदवी धारण करण्याचा अधिकार दिला

१० जून १९०२ : केंब्रिज विद्यालयाची शिक्षण व संस्कृती विषय एल एल डी ही पदवी ( डॉक्टर ऑफ लॉज)

१९०१ ते १९११ : निरनिराळ्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती.

१९०१ : गोवध बंदी कायदा

२ मे ते ऑगस्ट १९०२ : लंडन चा प्रवास

६ जुलै १९०२ : मागास जातींना नोकरीत 50 टक्के जागा राखीव ठेवणे

१९०६ सप्टेंबर : सहकारी तत्त्वावर शाहू मिल स्थापन .

१९०८ ते १९०९ : दामू जोशी प्रकरण

१९०९ : लक्ष्मी तलावाच्या कामास प्रारंभ.

११ जानेवारी १९११ : कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना.

१९१२ : सहकारी नियोजनाचा कायदा, मराठ्यांच्या हस्ते वेदोक्त श्रावणी राजपुत्राच्या अध्ययनाची सोय करण्यासाठी लंडनला रवाना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची घोषणा.

१९१३ : सत्यशोधक शाळेला वर्षासन पाटील स्कूल ची निर्मिती, इनामे अविभाज्य, गहान व ठेवण्याचा आधी

१० जून १९१७ : शंकराचार्या पिठावर डॉक्टर कुर्तकोटी यांची स्थापना.

१९१७ जुलै : पुनर्विवाहाचा कायदा मंजूर.

२७ डिसेंबर १९१७ : अकराव्या खामगाव मराठा परिषदेचे अध्यक्ष

२३ फेब्रुवारी १९१८ : कुलकर्णी वेतने बंद, तलाठी पद्धत सुरू, आंतरजातीय विवाह कायदा

३ मार्च १९१८ : बलुते पद्धत बंद.

२५ जून १९१८ : महारकी ( महार वतने) बंद

३१ ऑगस्ट : गुन्हेगारी जमाती हजेरी कायदा रद्द.

१५ सप्टेंबर : डॉक्टर कुर्तकोटी चा शंकराचार्य पिठाचा राजीनामा.

१० नोव्हेंबर : सी के बोले यांच्या लोक संघाच्या विद्यमानाने मागासलेल्या वर्गातील लोकांची मुंबई येथे जाहीर सभा.

१४ डिसेंबर : नवसारी आर्यधर्म परिषदेचे अध्यक्ष

१९ ते २१ एप्रिल १९१९ : कानपूर येथे हिंदुस्थानातील सर्व कुरणी क्षत्रियांच्या तेराव्या परिषदेचे अध्यक्ष राजश्री किताब

६ ते ८ मार्च १९२० : भावनगर येथे आर्य धर्म परिषदेचे अध्यक्ष.

२२ मार्च : अस्पृश्य वर्गाच्या परिषदेपुढे भाषण.

१५ एप्रिल : नाशिक येथे श्री उद्धवजी मराठा विद्यार्थी वस्तीगृहची कोनशिला समारंभ.

१६ एप्रिल : नाशिक येथे निरश्रित सोमवंशीय समाजाच्या परिषदेत भाषण.

३० मे : नागपूर येथे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेचे अध्यक्ष.

६ जुलै : शिवाजी क्षत्रिय वैदिक पाठशाळेत ची स्थापना.

२७ जुलै : हुबळी येथे कर्नाटक ब्राह्मणेतर समाज परिषदेची स्थापना.

१९२१ जानेवारी : शास्त्र जगद्गुरु ची स्थापना १९ नोवेंबर रायगड येथे शिवस्मारकाची पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते झाला. सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार, कोल्हापुरात ताराराणीचा रथ सोहळा सुरू.

१६ फेब्रुवारी १९२२ : दिल्ली येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष

६ मे : पन्हाळा लॉज मुंबई येथे मृत्यू.


शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य :

सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा चिरा पेटी येथे सुरू केली.

कृष्णाबाई केळकर या हुशार विद्यार्थिनीला ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवले.

मोफत शिक्षणाचा आराखडा त्यांनी १९१३-१९१४ मध्ये तयार केला.

करवीर संस्थानाच्या शिक्षणाधिकारी मीच लिटिल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याजागी श्रीमंती रखमाबाई केळकर यांना नेमले.

मराठा एक्य सभा ( मे १८८७): एन एम लोखंडे, विके बांदेकर, डीएस यंदे, के आर कोरेगावकर, के ए केळुसकर, एस के बोले   यांच्यासह.

१८४८ : कोल्हापूर, पन्हाळा, आळते, शिरोळ येथे मराठी शाळा स्थापन.

१८५१ : कोल्हापूर मध्ये पहिली इंग्रजी शाळा १८६७ मध्ये सुरु तिचे हायस्कूल मध्ये रूपांतर पुढे तिचे राजा राम महाराज कॉलेजचे नामकरण.

१८९४ : सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम वस्तीग्रह

१८९६ : राजाराम विद्यालयांमध्ये कृषी शास्त्राचा विशेष अभ्यासक्रम

१९०० : प्रथमेश राजवाड्यात काही विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. ते विद्यार्थी भीमराव पाटणकर, बाळासाहेब खानविलकर, कर्मवीर भाऊराव पाटील

नाशिकच्या उद्धवजी वस्तीगृह इमारत बांधकामास पंधरा हजार रुपये देणगी.

सांगलीच्या विलिंग्डन वस्तीगृहात तीस हजार रुपये तर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी एक लाख रुपयांची देणगी

शंकर बाजी ढवळे यांना आय सी एस परीक्षेसाठी इंग्लंड ला जाण्यासाठी रुपये दोन हजार रुपयाची मदत. सिताराम केशव तावडे यांना इंग्लंडमधील उच्चशिक्षणासाठी दोन हजार रुपयांची मदत

१९११ : किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल ची स्थापना.

शाहू महाराजांच्या अस्पृश्योद्धाराचे कार्य :

गंगाराम कांबळे या नौकरास सत्य सुधारक हॉटेल कोल्हापुरातील रहदारीच्या रस्त्यावर काढून दिले.

अस्पृश्यांना त्यांनी पैलवान बनवले त्यांना ते जाट पैलवान म्हणत तर चांभारराना सरदार, भंग्याना पंडित तर अस्पृश्यांना सूर्यवंशी म्हणून संबोधत.

१ ऑगस्ट १९१८ : महार, मांग, रामोशी व बेरड यांची हजेरी हुकुमाने बंद केली.

वेदोक्त प्रकरणी लोकमान्य टिळकांनी केसरी व प्राध्यापक विजापूरकरांनी ग्रंथमाला व समर्थ मधून शाहू महाराजांवर टीका केली.

७ ऑक्टोंबर १९०१ : राजवाड्यातील सर्व धार्मिकविधी वेदोक्त पद्धतीने करावेत असा हुकूम काढला.

१९०१ : पंचगंगेचा घाट त्यांनी सर्व जातीधर्मांच्या लोकांना खुला केला.

१७ मे १९०२ : सातव्या एडवर्डच्या राज्य होण्यासाठी इंग्लंडला गेले

१४ सप्टेंबर १९०२ : महाराजांच्या दत्तक मातोश्री आनंदीबाई यांचे निधन.


शाहू महाराज व सत्यशोधक चळवळ :-

१८७७ : सत्यशोधक समाजाचे पहिले वृत्तपत्र दीनबंधू सुरू संपादक कृष्णराव भालेकर

१७ जून १८८८ : ब्राह्मण सभेची स्थापना.

१९१० : सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन चिकोडी तालुक्यात

१९०४ : मराठा दिन बंधू हे वर्तमानपत्र भास्करराव जाधव यांनी सुरू केले.

११ जानेवारी १९११ : कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची स्थापना. ( अध्यक्ष परशुराम घोस वाडकर)

ब्राह्मणेतर मुलांसाठी कोल्हापूरला सत्यशोधक शाळा जुलै १९१३ मध्ये सुरू केली.

सातारा जिल्ह्यात १९१० नंतर सत्यशोधक चळवळ सुरू. नेतृत्व भास्करराव जाधव

१९१९ : साली साताऱ्यातील काली येथे सत्यशोधक समाजाची परिषद केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली भरली. तेथे कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्याचे जाहीर झाले.

कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्याला ध्वनीच्या बागेत स्थापन केलेल्या सर्व जातीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डिंग ला शाहू बोर्डिंग असे नाव दिले.

१९१६ : डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना.

शाहू महाराज आणि ब्राह्मणेतर चळवळ :

१८९५ साली महाराजांनी मथुरा येथे आर्य समाजाने मानपत्र दिले.

सत्यशोधक समाजाचे भीष्माचार्य प्रबोधनकार केशवराव सीताराम ठाकरे यांनी प्रबोधन मध्ये लिखाण केले.

१९१९ विजयी मराठा हे वृत्तपत्र श्रीपतराव शिंदे यांनी सुरू केले. या वृत्तपत्रास ब्राह्मणेत्तरचा केसरी म्हणून संबोधले जाई.

इतिहास संशोधक मंडळ ( धुळे) स्थापना : १९१० संशोधक दिका राजवाडे

कोल्हापूर मुन्सीपालर्टी ची स्थापना: १८६८

प्रतिनिधी लोकसभा कोल्हापूर स्थापना : १८८५

शिवाजी क्लब स्थापना : १८९५ ( हनुमंत राव कुलकर्णी व दामोदर हरी जोशी)

२५ जून जून १९१८ : रोजी शाहूमहाराजांनी कुलकर्णी वतने नष्ट केली. त्यावेळी कुलकर्णी संघटनेची दोन संमेलने भरली

१) पहिले संमेलन ५ एप्रिल १९१९ निपाणी अध्यक्ष न चि केळकर.

२) दुसरे संमेलन : १६ते १७ मे १९२० केश्वर अध्यक्ष दत्तोपंत बेळवी

२९ जुलै १९१८ रोजी त्यांनी तलाठी पद्धत सुरू केली.

३ ऑक्टोंबर १९२० : पुणे येथे शिवाजी सोसायटीची वार्षिक सभा भवानी पेठेतील विठ्ठल धर्मशाळेत शाहू महाराजांचे अध्यक्ष खाली.

सातारा येथील धनाजी शहा कपूर यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणेतर पक्षाला स्‍थापना मिळाली. १९२० नंतर ब्राह्मणेत्तर पक्षाचे मुंबई कौन्सिलचे पुढारी होते

१७ ऑगस्ट १९१९ रोजी ब्राह्मणी तरुणाने नारळी पौर्णिमेच्या दिवशी अंबाबाईची पूजा केली.


शाहू महाराजांचे अर्थकारण :

१९०५ साली 15 लाख रुपये भांडवली ची सूतगिरणी

१९१२ रायबाग ला श्री शाहू विणकरी संघटना

१८९५ मध्ये शेनगाव गारगोटी येथे काताचा कारखाना काढला.

राधानगरी येथे वूड डिस्टिलेशन फॅक्टरी सुरू. कोल्हापूर शाहुपुरी ही बाजारपेठ बसवली

१९१३ नागरी पतपेढी महाराजांनी सुरु केली

१९१८ लोकसंग्रह नावाची संस्था स्थापन सीताराम केशव बोले आणि महाराज या संस्थेचे आश्रयदाते होते

१९१९ फ्लू च्या साथीत कोल्हापूर शहरात उपचार केंद्रे उघडली

१८९१ शाहू महाराजांनी संस्थानाचे शास्त्रीय सर्वेक्षण तर १८९५ साली औद्योगिक सर्वेक्षण करून घेतले.

काळम्मावाडी व राधानगरी धरण योजना या जलसंपत्तीचे सर्वेक्षण १९०६ -१९०७ मध्ये गेले.

१९१४ शेतीविषयक प्रदर्शन भरवले

१९१२ सहकारी कायदा मंजूर केला

श्री लक्ष्मी तलावाची योजना महाराजांच्या काळात हाती घेण्यात आली. राधानगरी प्रकल्प १९०७ रोजी भोगावती नदीवर कोल्हापूरच्या पश्चिमेकडे दाजीपूर नावाच्या गावाजवळ फेजिवडे येथे 1909 साली राधानगरी प्रकल्पाचा शुभारंभ महाराणी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते झाला.

कला व क्रीडाप्रेमी राजे शाहू महाराज :-

१९१२ संगीता कलांसाठी उत्कृष्ट थेटर बांधले. त्याला केशवराव भोसले यांच्या स्मरणार्थ भोसले थेटर म्हणून संबोधले गेले. करमणुकीच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूरला १८९३ मध्ये देवल क्लब ची स्थापना

१८९५ साली प्रसिद्ध मोतीबाग तालीम बांधली. ए लोरीस हे रोमन कॅथलिक जातीचे धाडसी व धिप्पाड पैलवान महाराजांचे सुरक्षारक्षक म्हणून होते. मल्लांना गदा देण्याची पद्धत सुरु केली .१९१२ साली इमाम बक्ष यास गदा दिली

१९१२ साली धोरा सुतार यांच्याकडून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार करून पन्हाळगडावर बसवला. कोल्हापूरला घोड्यांची शर्यत सुरू आप्पाजी धोंडीराज मुरले ऊर्फ कवी सुमंत यासारखे कवी महाराजांच्या आश्रयाखाली होता. शौकत रागिनी, मुक्तीकमला, गीतावली, भाव निनाद हे काव्य त्याने लिहिली. त्यात कवी मौत्तिक ही पदवी दिली.

१९२० कोल्हापूर संस्थानात घटस्फोटाचा कायदा पास केला.