नमस्कार मित्रांनो शाळा बंद झाल्या तर मराठी निबंध । Shala Band Zali Tar Nibandh In Marathi या विषयावर आज आपण निबंध लेखन करणार आहोत. चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करूया.

शाळा-बंद-झाल्या-तर-मराठी-निबंध
शाळा-बंद-झाल्या-तर-मराठी-निबंध

कधीकधी शाळांचा खूप कंटाळा येतो. सतत अभ्यास करावा लागतो. एकाच वर्ग खोलीत बसून राहावे लागते. हवे तेव्हा हवे ते करता येत नाही. गृहपाठ केला नाही तर शिक्षा होते. जरा चूक झाली की बाई आमच्या आई-बाबांना बोलावतात. परीक्षेत नापास झाल्यावर खूप दुःख होते. म्हणून वाटते की शाळा बंद झाल्या तर खूप बरे होईल हा सगळा त्रास वाचेल. मात्र शाळा बंद झाल्या तर खूप नुकसान होईल. शाळेमुळे मित्र मिळतात.

खूप गप्पा मारतात. खूप खेळता येते. आमच्या वर्गात पुस्तक वाचण्याचा तास असतो, तेव्हा आम्ही गोष्टीचे पुस्तक वाचतो. आमचे शिक्षक आम्हाला गोष्टी सांगतात. गाणी म्हणून दाखवतात. हा सगळा आनंद नष्ट होईल.

शाळा नसेल तर ज्ञान मिळणार नाही. मग डॉक्टर निर्माण होणार नाहीत. शास्त्रज्ञ निर्माण होणार नाही. त्यामुळे आपले खूप नुकसान होईल छे छे शाळा हवीच.

मित्रांनो शाळा बंद झाल्या तर मराठी निबंध । Shala Band Zali Tar Nibandh In Marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा