लोकमान्य-टिळक-निबंध-मराठी
लोकमान्य टिळक निबंध मराठी

लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. लहानपणापासून त्यांना कोणत्याही प्रकारचा अन्याय अजिबात सहन होत नसे. पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. पुण्यामध्ये त्यांनी इंग्लिश स्कूल नावाची शाळेची स्थापना केली. या शाळेमध्ये त्यांनी स्वतःला गणित शिकवण्याचे काम केले. देशातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण झाली तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवता येईल असे त्यांना जाणवले.

सर्व समाज एकत्र, संघटित म्हणून त्यांनी गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव असे सार्वजनिक उत्सव सुरू केले. केसरी व मराठा या वृत्तपत्रातून त्यांनी इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध भडिमार केला. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. " स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच"  अशी सिंहगर्जना करून त्यांनी इंग्रज सरकारला हादरवून सोडले. लोकांचे ते आवडते नेते असल्याने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली गेली.