महात्मा-गांधी-निबंध-मराठी
महात्मा गांधी निबंध मराठी 

महात्मा गांधी निबंध क्रमांक १ :
भारतातील लोकांवर होणारा ब्रिटिशांचा अन्याय पाहून त्यांना अतिशय चीड आली व म्हणून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला मिठा सारख्या साध्या गोष्टीवर ही इंग्रज तर काजू निकर बसवत असे म्हणून गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. यालाच दांडीयात्रा असे म्हणतात. हजारो लाखो लोक या दांडिया ते सहभागी झाले होते.

१९४२ साली गांधीजींनी  चले जाव ही चळवळ सुरू केली.  ब्रिटिश  सरकारला चले जाव छोडो भारत असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. भारतातील बहुतांश लोक गरीबीमुळे अर्धवस्त्र राहत होते. म्हणून गांधीजींनी अतिशय वाईट वाटले. मग त्यांनी फक्त पंचा नेसायला सुरुवात केली. अशा या थोर नेत्याला लोकांनी महात्मा ही पदवी दिली. सर्व जग त्यांना महात्मा गांधी म्हणून ओळखते.

महात्मा गांधी निबंध क्रमांक २ :

महात्मा गांधी महात्मा गांधी एक महान स्वातंत्र्यसैनिक होते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महान योगदानामुळे त्यांना राष्ट्रपिता किंवा बापू म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदरमध्ये दिवाण म्हणून काम करत असत.

बाकिली केलीक्षण आफ्रिया जाणा-यजावे ला इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले व भारतात परत येऊन त्यांनी वकिली केली. त्यानंतर गांधीजींनी जवळपास २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली. तिथे त्यांना भारतीयांना दिल्या जाणाऱ्या असमान वागणुकीला व भेदभावाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत सकारात्मक बदल आणण्यासाठी त्यांनी राजकीय कार्यकर्ते बनण्याचा निर्णय घेतला.

१९१५ मध्ये ते भारतात परतले व नंतर काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सत्याग्रह आंदोलन सुरू केले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ब्रिटिश सरकारचा विरोध करण्यासाठी अहिंसात्मक असहकारआंदोलने सुरु केली. १९४२ मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलन चालू केले ज्यामुळे इंग्रजांना आपला देश सोडणे भाग पडले आणि अशा प्रकारे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.

टीप : वरील निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
Essay On Mahatma Gandhi In Marathi
Mahatma Gandhi Information In Marathi Essay
राष्ट्रपिता महात्मा गांधी 
Rashtrapita Mahatma Gandhi
mahatma gandhi nibhandh marathi
maza avadta neta
maza avadta neta marathi nibandh