माझा-वाढदिवस-मराठी-निबंध
माझा-वाढदिवस-मराठी-निबंध

वर्षातील एका ठराविक दिवसाची मी वाट पाहते. तो दिवस म्हणजे  माझा वाढदिवस. या दिवशी मी आईने आणलेल्या नवीन ड्रेस घालून शाळेत जाते. वर्गातील सर्व मुलांना मी चॉकलेट पेन्सिल वाटते. सर्व मुले टाळ्या वाजून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. संध्याकाळी माझे मित्र मैत्रिणी घरी येतात. रंगबिरंगी माळा, फुलांच्या माळा वगैरे लावून घर सजवण्यात येते. 

सर्वजण जमल्यावर आम्ही गाणी म्हणतो, एकमेकांना विनोद सांगतो. माझा मामा तर आम्हाला वेगवेगळे खेळ शिकवतो. त्याच्या गमतीजमती ऐकून तर हसून हसून पोट दुखायची वेळ येते. बाबा आम्हा सर्वांचे फोटो काढतात. या दिवसाची मुख्य व्यक्ती मी असल्याने सर्वजण माझे खूपच कौतुक करीत असतात. तर अशाप्रकारे मी माझा वाढदिवस दरवर्षी साजरा करते.