![]() |
पावसाळा निबंध मराठी |
पावसाळा निबंध मराठी क्रमांक १
पाऊस निसर्गाची देणगी आहे. पावसाचे पाणी जमिनीवर खोलवर जिरते आणि नदी, विहिरी यांना पाणी मिळते. शेतीसाठी तर पाण्याचा फार मोठा उपयोग होतो. अन्नधान्य पिकासाठी शेतकऱ्यांना पावसाचे पाणी उपयोगी ठरते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सगळीकडे कठीण झाला आहे. जगातील पिण्याच्या पाण्याचे प्रमाण लोक वर्षाच्या तुलनेत कमी होत चालले आहे, त्यामुळे हा प्रश्न जागतिक पातळीवर चर्चिला जात आहे. पाऊस पडतो तेव्हा शक्यतो पावसाचे पाणी वाचनाचा प्रयत्न प्रत्येकाने केला, तर पाण्याचा प्रश्न फार बिकट होणार नाही. पिण्याच्या पाण्या शिवाय माणसाला पर्याय नसल्यामुळे प्रत्येकाने पाणी साठवावे आणि गरजेपुरते पाणी वापरावे, असा संदेश देण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
************
पावसाळा निबंध मराठी क्रमांक २ :
सर्व ऋतूंमध्ये पावसाळा हा ऋतू मला फार आवडतो. जून पासून सप्टेंबर पर्यंत चार महिने पावसाळा असतो. आकाशात काळे ढग जमू लागतात. सगळीकडे मातीचा सुगंध पसरतो. रानामध्ये मोर पिसारा फुलवून नाचू लागतो. पावसाची काळोखही वाढत जाते रिमझिम पाऊस पडू लागतो. हळूहळू नद्या नाले विहिरी भरून वाहू लागतात. सगळीकडे हिरवेगार गवत होते. धरणी मातेने जणूकाही हिरवा शालू नेसला आहे असे वाटते. झाडे अगदी आंघोळ केल्यासारखे टवटवीत होतात. शेतकरीही आनंदाने पिकांची लावणी करायला लागतो. मोठे वादळ सुरु होते. ढगांचा गडगडाट होतो व धो धो पाऊस पडू लागतो.
राणा मध्ये वेगवेगळ्या प्रकारची रंगीबिरंगी फुले फुलतात. डोंगरावरून मोठे धबधबे वाहू लागतात. बाबा आम्हाला तळ्यामध्ये पोहण्यासाठी घेऊन जातात.खूप पाऊस पडला की शाळांनाही सुट्टी मिळते. आम्ही पाण्यामध्ये कागदाच्या होड्या करून सोडतो. पावसामुळे तर आपल्याला पाणी व अन्न मिळते. आम्ही आनंदाने गाणी म्हणतो येरे येरे पावसा तुला देतो पैसा.
पावसाळा निबंध मराठी क्रमांक ३ :
पावसाळा पथ्वीवरती अनेक ऋत आहेत जसे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. हे सारे ऋतू महत्वाचे आहेत, पण माझा आवडता ऋतू आहे पावसाला.पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे शेतकरी. पावसामुळेच शेती पिकते, आपल्याला पिण्याचे पाणी मिळते. आपल्या प्रमाणेच पक्षी, प्राणी, झाडे, वेली या सगळ्यांचेच जीवन पावसावर अवलंबन असते.अंदाजे जुनच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा सुरु होतो. पहिल्या पावसात मातीचा छान सुगंध अनुभवायला मिळतो. उन्हाने तापलेल्या पृथ्वीवर अचानक गारवा पसरतो. आकाशात दाटलेले काळे ढग, थंडगार वारा यामुळे मन प्रसन्न होऊन जातो. | लहान मुले पावसाच्या पाण्यात भरपूर खेळतात व पाण्यात होड्या सोडून पावसाचा आनंद लुटतात. पावसाळ्यात फेसाळलेल्या समुद्राच्या लाटा पाहण्याचा आनंदही काही वेगळाच असतो. सप्तरंगी उधळण करणारा इंद्रधनुष्य पाहायला मिळतो तो सुद्धा पावसाळ्यातच असा हा पावसाळा ऋतू प्रत्येक वेळी मनाला आनंदी व प्रफुल्लित करतो, म्हणून मला पावसाळा खूप आवडतो.
1 Comments
Very nice and acrativ
ReplyDelete