शिक्षक-दिन-निबंध-मराठी
शिक्षक-दिन-निबंध-मराठी

सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ साली झाला. ते स्वतः अतिशय चांगले शिक्षक होते. फारच लहान वयात त्यांनी तत्त्वज्ञानाचा फार मोठा अभ्यास केला होता. अतिशय कठीण विषय सोपा करून शिकवणे ही त्यांची हातोटी होती. लहान मुलांवर संस्कार करून त्यांना घडवण्याचे काम शिक्षकांनी मनापासून केले पाहिजे असे त्यांचे मत होते.

 डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठे कार्य केले म्हणून ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. भारतीय संस्कृतीबद्दल इंग्रजी भाषेमध्ये अनेक ग्रंथ लिहिले. त्यामुळे जगातील लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख झाली.

शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेमध्ये स्वतः मुलं शिक्षक म्हणून काम करतात. दिवसभर शाळा  चालवतात.. शिक्षक बनून मुलांना वेगवेगळे विषय शिकवतात. मला तर त्या दिवशी शिक्षक व्हायला फार आवडते.

ज्या शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली आहे, त्या शिक्षक दिनाच्या दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो व त्यांचा सन्मान करण्यात येतो.