शिवाजी-महाराज-निबंध-मराठी
शिवाजी-महाराज-निबंध-मराठी


शिवाजी महाराजवर १० सोप्या ओळी  | 10 Lines On Shivaji Maharaj In Marathi

1.छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले असे आहे.
2. शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जन्नर शहरा जवळ वसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.
3. छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले
जातात.
4. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आई चे नाव जिजाबाई असे आहे.
5. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
6. जिजाबाईंनी शिवबा ला युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण दिले .
7. छत्रपती शिवाजी एक हुशार व धर्मनिर्पेक्षराजा होते. ते एक शुर योध्दा होते.
8. वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणागड जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले.
9. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख 'शिवशंभू' असा होतो.
10.  ३ एप्रिल १६८० रोजी राजगड किल्ल्यावर शिवरायांचा मृत्यू झाला.

शिवाजी महाराज निबंध मराठी क्रमांक १ :
शिवाजी महाराजांचा जन्मस्थान १६३० मध्ये राजमाता जिजाबाई यांच्या पोटी झाला. त्यावेळी महाराष्ट्रातील सुलतानी राजवटीमुळे सामान्य जनता त्रासुन गेली होती. त्यामुळे शिवाजी महाराज म्हणजे जनतेला अगदी देव  देवदूता सारखे सुद्धा सारखे वाटत होते.  लहानपणापासून शिवाजी महाराजांनी लढाई खेळणे फारच पसंत होते. महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांनीसुद्धा दांडपट्टा खेळणे, भाले वरची चालवणे वगैरे सर्व प्रकारचे शिक्षण दिले. जिजाबाई अण्णा रामायण-महाभारतातील चोरांच्या गोष्टी सांगत असत. 

त्यामुळे त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार ठसवले गेले. नीतिमत्तेचे राजकारण कसे करावे, सावधपणे कसे राज्य चालवावे. या सर्व गोष्टींचे ज्ञान त्यांना लहानपणापासून मिळाले होते. बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर, तानाजी, येसाजी असे अनेक शूर मावळे साथीदार म्हणून लाभले होते. या सवंगड्या बरोबर त्यांनी रोहिडेश्वर येथे स्वराज्याची स्थापना घेतली होती. आपल्या शूर मावळ्यांच्या मदतीने महाराजांनी स्वराज्याचा भगवा झेंडा महाराष्ट्रामध्ये मोठ्या डौलाने फडकला.

शिवाजी महाराज निबंध मराठी क्रमांक २ :

मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते एक असे राजे होते जे जनतेसाठी जगले व गलामगिरीच्या जगण्याला त्यांनी नाकारले. या शूरवीर व पराक्रमी राजाला जनता शिवराय, शिव, शिवबा, राजे, शिवाजी महाराज अशा अनेक नावाने संबोधते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. असे सांगण्यात येते कि जिजाबाईनी आपल्याला पुत्र व्हावा म्हणून शिवनेरी गडावरील शिवाई देवीला प्रार्थना केली होती, म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. असे सांगण्यात येते कि जिजाबाईनी आपल्याला पुत्र व्हावा म्हणून शिवनेरी गडावरील शिवाई देवीला प्रार्थना केली होती, म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले. वयाच्या पंधराव्या वर्षी काही विश्वास मावळ्यांना जमवून शिवाजी राजेंनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. 

वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणागड जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे त्यांनी कोंढाणा (सिंहगड), विजयदुर्ग, लोहगड, पुरंदर, राजगड असे शंभराहन अधिक किल्ले जिंकले. त्यांनी युद्धांत शक्ती सोबत यक्तीचाहि वापर केला. शिवाजी राजे सर्वगुणसंपन्न होते. ते हिंदुत्व, संस्कृत व मराठी भाषेचे समर्थक होते पण त्यांनी दुसऱ्या धर्माचाही आदर केला. त्यांच्या सैन्यामध्ये सर्व धर्माचे सैनिक होते. शिवरायांचे शौर्य, राजधर्मपालन, कल्पकता, संघटन कौशल्य इत्यादी गुणांनी पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. ३ एप्रिल १६८० रोजी राजगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. या दिवशी सह्याद्री सहित प्रत्येक व्यक्ती रडत होती. स्वतंत्र स्वराज्य ज्या व्यक्ती ने निर्माण केले तो रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या दिवशी जनतेपासून दुरावला.

शिवाजी महाराज निबंध मराठी क्रमांक ३:

छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान तसेच आदर्श राजा होते. त्यांचा जन्म फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरीया |किल्ल्यावर झाला.त्यांच्या आईचे नाव जिजाबाई. तर वडिलांचे नाव शहाजी भोसले हे होते. शिवरायांची बालूपणू खूप धामधुमीत गेले. त्यांनी वयाच्या १२व्या वर्षापर्यंत आई जिजाऊच्या देखरेखेखाली व शहाजी राजांनी नेमलेल्या नामवंत शिक्षकाकडून अनेक कला, विदया, भाषा अवगत कल्या.

शिवरायांपूर्वी सुमारि ४०० वर्षे महाराष्ट्रात स्वराज्या नव्हते. महाराष्ट्राचा बहुतांश भाग अहमदनगरचा निजामशहा व विजापूरचा आदिलशहा यांच्या सत्तेत होला याविरूध्द लढण्यासाठी व जनतेला कायमचे। सखी करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्याचे पवित्र 

कार्य हाती घेतले.त्यांनी वयाच्या अवघ्याव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवराय जरी वयाने लहान असले तरी त्यांच्या मनाची भरारी प्रचंड मोठी होती.त्यांना महाराष्ट्रात जीवास जीव देणारे मावळे निर्माण केले. शिवरायांनी विजापूरच्या दरबारातील भारी सरदार अफजलखानास शक्तीपेक्षा युक्तीने धुळीस मिळवले. त्यांच्या आयुष्यात घडलेला प्रत्येक प्रसंग महाराष्ट्रास प्रेरणा देती.

शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या तंत्राचा अवलंब करून अनेक गड किल्ले जिंकले.या तंत्राचा वापरा करताना त्यांना सह्याद्री पर्वतातील घनदाट जंगल,डोंगरी किल्ले प्रजेचा पूर्ण पाठिबा मिळाला. शिवाजी महाराजांनी वनदर्ग.गिरिदर्गव जलदुर्ग हे तीन प्रकारचे किल्ले बांधून लोकांमध्ये देशप्रेम व आत्मविखास निर्माण केला.

शिवरायांनी इंग्रज, सिद्दीव पोर्तुगीज यांना दरारा वाटावा असे भक्कम आरमार उभारले.शिवाजी राजांना भारतीय आरमाराचे जनक म्हटल जति.त्यांनी आपल्या स्वराज्यात कधीही कोणताही भेदभाव केला नाही. । संताचा, विद्वानांचा सत्कार केला. मंदिरव मशिदींच रक्षण केले. पर्यावरण सरंक्षणाला प्राधान्य दिले. स्त्रियांचा सन्मान केला.

असा हा आदर्श पुत्र कुशल संघटक रयतेचा वाली, दुर्जनांचा कर्दनकाळ व सज्जनांचा कैवारी, थोर राष्ट्रपुरुष ३एप्रिल ६८० रोजी जनतला दाखसागरात लोटून अनंतात विलीन झाला.


शिवाजी महाराज निबंध मराठी क्रमांक 4 :

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव शिवाजी शहाजी भोसले असे आहे. शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी गडावर झाला. शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले.

जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज, शिवबा, राजे, या नावाने ओळखते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे आणि आईचे नाव जिजाबाई असे आहे. दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरू होते. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जिजाबाईंनी त्यांना लहानपणी रामायण,महाभारतातील गोष्टी सांगून संस्कार घडविले. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज, शिवबा, राजे, या नावाने ओळखते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे आणि आईचे नाव जिजाबाई असे आहे. दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरू होते. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जिजाबाईंनी त्यांना लहानपणी रामायण,महाभारतातील गोष्टी सांगून संस्कार घडविले. वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. जेंव्हा ते पुण्याचा कारभार पाहत होते तेंव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनौ:शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते
म्हणजे जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र वाडत जातो आणि विश्वात वंदनीय होतो तशीच शिवाजी महाराजांची ही  मुद्रा तिचा लौकिक वाढत जाईल. शिस्तबध्द लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य उभे केले. वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.

३ एप्रिल १६८० रोजी राजगड किल्ल्यावर शिवरायांचा मृत्यू झाला. स्वराज्य निर्मितीची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणारा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या दिवशी जनतेपासून दुरावले.

---------------

शिवाजी महाराज निबंध मराठी क्रमांक 5 :


अखंड हिंदूस्तानचे आराध्य दैवत, स्फूर्तीस्थान असणारे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवराय, शिवबा, राजे अशा अनेक नावांनी

ओळखल्या जाणा-या शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे आहे.

शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेबुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी गडावर झाला. शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. १९ फेबुवारी म्हणजेच शिवाजी महाराजांचा जन्मदिवस शिवजयंती म्हणून साजरा केला जातो.

शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे आणि आईचे नाव जीजाबाई असे होते. लहानपणीच शिवरायांना दांडपट्टा, तलवारबाजी, भाला, गजारोहन यांचे प्रशिक्षण मिळाले आणि दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरू होते. वयाच्या १०व्या वर्षी म्हणजेच १६४० मध्ये शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई यांच्याशी झाला.

वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी शहाजी महाराजांनी शिवरायांना पुण्याची जहागीर सुपुर्त केली. त्या काळात शिवरायांची संपूर्ण जबाबदारी राजमाता जिजाऊंवर होती. जिजाऊंनी शिवरायांना रामायण-महाभारतातील गोष्टी सांगून संस्कार घडविले. त्यांनी शिवरायांना धैर्याची, कर्तुत्वाची जाणिव करून दिली.

वयाच्या १५ व्या वर्षी शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांसमवेत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. स्वराज्य निर्मितीच्या या काळात त्यांनी तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. पुण्याचा कारभार पाहत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची राजमुद्रा तयार केली.

ती राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. स्वराज्य निर्मितीच्या काळात शिवाजी महाराजांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. परंतु न डगमगता त्यांनी लढा चालूच ठेवला. प्रतापगडावरचा पराक्रम, आग्राहून सुटका, सुरतेची लूट, शाहिस्तेखानाची फजिती या सर्व रोमांचकारी गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत गेल्या. या सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तीमत्व दिसून येते. शिस्तबध्द लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर त्यांनी सामर्थ्यशाली राज्य उभे केले. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले. अष्टप्रधान मंडळात योग्य लोकांची नेमणूक करून त्यांना मंडळाची पदे देऊन राज्यकारभार सुरळीत चालवला.गनिमी काव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या. ६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. पंडित गागा भट्टांनी राज्याभिषेकाचा विधी पार पाडला. या राज्याभिषेकात शिवरायांचा छत्रपती, क्षत्रिय कुलावतंस, हिंदू धर्मोध्दारक, शककर्ते या नावांनी गौरव करण्यात आला.
शिवाजी महाराज मराठी व संस्कृत भाषेचे समर्थक होते. त्यांनी स्वराज्य कारभारात नेहमी मराठी भाषेला प्रोत्साहन दिले. स्त्री स्वातंत्र्याला त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले. स्त्रियांचा नेहमी त्यांनी आदर केला. जनतेवर अन्याय करणा-यांना त्यांनी कठोर शिक्षा ही दिली. शिवाजी महाराज हे प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे राजे होते. ३ एप्रिल १६८० रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले.

--------

शिवाजी महाराज निबंध मराठी क्रमांक 6 :


साडेतीनशे वर्षाच्या गुलामगीरीच्या बंधनातून मुक्त करून हिंदवी स्वराज्यात सुख आणि शांतीने जगण्याचा अधिकार छत्रपती शिवाजी | महाराज यांनी अथक परिश्रम करून जनतेला | दिला. अशा या शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. दरवर्षी आपण हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा करतो.

त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते. जिजाबाई शिवाजी महाराजांना प्रेमाने शिवबा म्हणत.आई जिजाबाईनी लहानपणापासून शिवाजी महाराजांना सत्यासाठी आणि न्यायासाठी लढायला शिकवले. हि जिजाऊंची शिकवण कायम शिवाजी महाराजांच्या सोबत होती.

शिवाजी महाराजांच्या अंगी जन्मत:च नेतृत्व क्षमता होती. वयाच्या पंधराव्या वर्षी काही विश्वासू मावळ्यांना जमवून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि सहकान्यांसमवेत सह्याद्रीच्या कडेकपार्या फिरून काढल्या. सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण न्यायशास्त्र, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'गनिमी कावा' यात शिवराय तरबेज झाले. कोंढाणा, विजयदुर्ग, लोहगड, पुरंदर, राजगड | असे शंभाराहून अधिक किल्ले जिंकले आणि  हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमूक्त केले. स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शत्रूचा सुळसुळाट होता. आपल्या धुरंधर आणि दूरदृष्टीने त्यांनी स्वराज्याच्या शत्रूचा बीमोड केला.

अफजलखानाशी केलेले युद्ध, शायस्तेखानावर छापा, सुरतेची लूट, औरंगजेबच्या दरबारात त्यांनी केलेला बिनधास्त प्रवेश, विशालगडावरचा चकवा, मोगल साम्राज्यातून सहिसलामत परतीचा प्रवास या सर्व रोमाचकारक गोष्टींवरून शिवरायाचे धैर्यवान व्यक्तिमत्व आपणास दिसून येते. शिवरायांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले. त्यांच्या राज्यात प्रजेला न्याय मिळत होता. अपराध्यांना शासन होत होते. शेतकऱ्यांची गाहाणी दूर होत होती. प्रजेच्या हिताच्या अनेक योजना शिवरायांनी सुरू केल्या होत्या. प्रजाहितदक्ष राज्यकारभार करुन खऱ्या अर्थाने ' बहुजन हिताय,बहूजन सुखाय' याचा प्रत्यय आणून दिला होता. 6 जून 1674 मध्ये राज्यभिषेक झाल्यावर ते छत्रपती झाले. स्वराज्यात जनता सुख समाधानाने नांदू लागली.

राज्यकारभार शिस्तीत चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले. खरे तर ते आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रनेतेच होते. अखंड परीश्रम, दगदग यांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होताच. अखेर 3 एप्रिल 1680 मध्ये शिवरायांनी स्वर्गारोहण केले. राज्यकारभार शिस्तीत चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले. खरे तर ते आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रनेतेच होते. अखंड परीश्रम, दगदग यांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होताच. अखेर 3 एप्रिल 1680 मध्ये शिवरायांनी स्वर्गारोहण केले.