![]() |
aajiche-manogat-marathi-nibandh |
वयोवृद्ध आजीचे मनोगत | Aajiche manogat marathi nibandh : कधीकधी लहान असणारी मी हळूहळू वयाने वाढत आता आजी झाले आहे. घरात सून, मुलगा, दोन नातवंडे अशी माणसे आहेत. त्या सर्वांमध्ये राहून माझे आयुष्य छान चालले आहे. माझ्या घरी स्वतःला एक छोटीशी खोली आहे, जि मला पुरेशी आहे. सकाळी मला लवकर जाग येते आणि खिडकीतून उगवणारा सूर्य मला दिसतो. माझे सकाळचे सगळे आवरून होईपर्यंत सून मला चहा देते. नंतर दोन्ही नातवंडे मला ' टाटा' करून शाळेत जातात. कामाची बाई आल्यावर माझी सून आणि मुलगा नोकरीवर जातात. मग दिवसभर ती बाईक माझ्या सोबत राहते. संध्याकाळी सगळेजण घरी आल्यावर ती घरी जाते.
रात्री मुलगा, सून आणि नातवंडे माझ्या खोलीत गप्पा मारायला येतात. मला वाचनाची आणि विणकामाची आवड आहे माझा दिवसाचा बराचसा वेळ माझे छंद जोपासण्यात जातो. कडून मी शक्यतो कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेते; त्यामुळे आमच्या सर्वां मधले प्रेम आणि जिव्हाळा टिकून आहे. संध्याकाळी मी जवळच असलेल्या गणपती मंदिरात दर्शनाला जाते, तेथे माझ्या समवयस्क मैत्रिणीची थोडा वेळ बोलत बसते आणि नंतर परत येते. माझ्या उर्वरित आयुष्यात माझ्या वाटेला आलेले सुखाचे दिवस शेवटपर्यंत असेच राहत असे मला वाटते.
0 Comments