आई-संपावर-गेली-तर-मराठी-निबंध
आई-संपावर-गेली-तर-मराठी-निबंध

आई संपावर गेली तर मराठी निबंध

प्रत्येक घरी आई हा सगळ्यांचा घरचा आधारस्तंभ असतो. आईची भूमिका इतकी महत्त्वाची असते की आई जरा इकडे तिकडे गेली तर घरातल्या प्रत्येकाची फजिती होते. आई घरात सगळ्यांसाठी काही ना काही काम करत असते आणि जर का आईने एखाद्या दिवशी पूर्ण सुट्टी घेतली तर ? बापरे !!! आईने सुट्टी घेतली तर स्वयंपाक कोण करणार ? दूध नाश्ता कोण देणार ? बाबांना कामावर जाताना मदत कोण करणार ? आणि आपण संध्याकाळी सगळे जण घरी येऊ तेव्हा आपल्यासाठी खाऊ कोण तयार करणार आपली वाट कोण बघणार ?

आपल्या सगळ्या कामांमध्ये आधारस्तंभ असणाऱ्या आईला आपण काहीच मदत करत नाही. तेव्हा आता आईचे महत्व ओळखून आईने संपावर जाऊ नये म्हणून आपण तिला कामात मदत केली पाहिजे. मदतीचा हात दिला पाहिजे.