pariksha-nastya-pariksha-nasti-tar-marathi-nibandh
pariksha-nastya-pariksha-nasti-tar-marathi-nibandh

Pariksha Nastya Pariksha Nasti Tar Marathi Nibandh

प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेचा बाऊ वाटतो. बहुतांश मुलांना परीक्षा नको असे वाटते. परीक्षा म्हणजे एक प्रकारचे संकट भीती या भावना असतात. मी पण परीक्षा नको म्हणणार यापैकीच एक आहे. परीक्षा नसेल तर अभ्यासावरून घरात पालकांची बोलणी खावी लागणार नाहीत. गृहपाठ शिक्षकांचे रागावणे आणि वरच्या वर्गात आपोआप जायला मिळणार. तेव्हा फक्त खेळ आणि खेळ खेळायला मिळणार धमाल मजा करायला मिळणार. परीक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाची कटकट नाही पाठांतर नाही लक्षात ठेवून पेपर लिहिताना आठवणी नाही. त्यामुळे परीक्षा नसलेलीच बरी.


पण मग वर्गात हुशार कोण, ढ कोण ? हे कसे कळणार ? आपली शैक्षणिक प्रगती होत आहे की नाही, याची माहिती कशी होणार ? कितवा नंबर येणार आहे कसे कळणार ? मोठ्या वर्गात गेल्यावर तिथला अभ्यास आपल्याला कसा जमणार ? या सगळ्या प्रश्नावर चा रामबाण उपाय म्हणजे आपल्याला दर वर्षी परीक्षा देऊन आपली योग्यता बघावी लागेल ? मुळे परीक्षा कधीच रद्द होता कामा नयेत ? त्यामुळे आपलेच नुकसान होण्याची शक्यता आहे ? त्यामुळे आता माझे मत शालेय परीक्षा या दरवर्षी व्हायलाच पाहिजेत असे आपण सर्वांनी मनापासून अभ्यास करून यश मिळवले पाहिजे, असे झाले आहे.