सर्कशीतील-हत्तीचे-मनोगत
सर्कशीतील-हत्तीचे-मनोगत

सर्कशीतील हत्तीचे मनोगत | Sarkashitil Hattiche Manogat Marathi : 
मोठा सर्कस चा गोल. त्यात मी माझ्या मित्राबरोबर गोल फिरतोय. मधूनच सोड वर करून नमस्कार करतोय समोर बसलेली लहान मुले आनंदाने टाळ्या वाजून ओरडत आहेत. हा माझा रोजचाच कार्यक्रम. सर्कशीच्या रिंगणात प्रेक्षकांसमोर असताना खूप बरे वाटते. आपण दुसऱ्याची करून करून त्यांना आनंद देत आहोत याचे समाधान वाटते. सर्कस चा खेळ संपला आणि आज गेले, की लगेच मला साखळी दंडामध्ये बांधले जाते. पायात साखर बंद असल्यामुळे जळजळ वाटते. खूप वाईट वाटते. असा मी हत्ती आहे. आधी मी आमच्या कळपात राहात होतो. माझी आई, बाबा, काका माझी भावंडे आम्ही सात एकमेकांच्या सहवासात राहत होतो. आमचे आयुष्य स्वच्छंदी होते. झाडाची पाने खायची, गवतावर लोळायचे, मध्ये तासन्तास डुबायाचे एकमेकांच्या अंगावर सोंडेने पाणी उडवायचे, अशा गमतीजमती आम्ही करत होतो.


पण एक दिवस अचानक काहीच काही माणसे जंगलात आली होती. त्यांनी मला आणि माझ्या भावाला फास टाकून पाडली सर्कशीत आणले. येथे आम्हाला रंगाच्या छडीने धाक दाखवून नवीन नवीन खेळ करायला शिकवण्यात आले. आमचे शिक्षक कधी प्रेमाने, कधी रागावून आमच्याकडून कामे करून घेऊ लागले आम्हाला सर्व गोष्टी उत्तम जमू लागल्यावर त्यांनी आम्हाला सरकारच्या गोलात प्रयोग करून दाखवायला लावणे. आमच्या कामावर सरकारचे अधिकारी आणि प्रेक्षक खूश आहेत. आता मला आणि माझ्या भावाला खूप प्रेमाने वागवले जाते. पण माझ्या नातेवाईकांबरोबर जंगलात स्वच्छंदी आयुष्याचा अनुभव पुन्हा मला घेता येईल का ?