internet-var-marathi-nibandh
internet-var-marathi-nibandh

  इंटरनेटचे जग मराठी निबंध | Internet Var Marathi Nibandh : -

आधुनिक काळ म्हणजे संगणकाचा काळ. संगणकाच्या शोधाने जगात क्रांती झाली, असे म्हटले तर योग्य ठरेल. हल्ली आणि त्याच्या घरी संगणक असतो संगणकाचा परिचय अनेकांना असतो. इंटरनेट म्हणजे हजारो संगणकाचे जाळे. संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा आपणही आजच्या आधुनिक काळाची उपयुक्तता आहे. इंटरनेटद्वारे आपण घरात बसून परदेशातील आपल्या जिवलग व्यक्तींशी मनसोक्त गप्पा मारू शकतो; आपले निरोप सहजपणे पाठवू शकतो. 

पूर्वीच्या गाडी पत्र पाठवले जात असे पण ते पोहोचायला खूप जास्त वेळ लागत असे. मात्र आता ताबडतोब एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतो. पत्र उत्तरा प्रमाणेच इंटरनेटवरून आपण कोणत्या विषयावर ज्ञान संपादन करू शकतो; नवीन विषयाची माहिती मिळू शकतो. मनोरंजनाच्या साईटवरून आपण आपली करमणूक करून घेऊ शकतो. जग जवळ आणले आणि जगाच्या जवळ जाण्याचे एक उत्तम साधन म्हणजे इंटरनेट आहे.