खडूच्या-मनातील-विचार-मराठी-निबंध
खडूच्या-मनातील-विचार-मराठी-निबंध

 खडूच्या मनातील विचार मराठी निबंध | Khadu Che Manogat Marathi Nibandh

लहानपणापासून मोठ्यापर्यंत मी सर्वांचा आवडता आहे. माझा पांढराशुभ्र रंग सर्वांना मोह पडतो. पांढऱ्या बरोबर माझे निळे, लाल, भगवा, हिरवा असेही रंग आलेले असतात. ते मुलांना खूप आवडतात. पांढर्‍याशुभ्र कॅल्शियमच्या भुकटीपासून माझी निर्मिती होते. माझा मुख्य उपयोग म्हणजे फळ्यावर लिहिण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये प्रत्येक शिक्षकांच्या हातात मी असतोच. फळ्यावर लिहीत असताना जिजाऊंनी हळूहळू लहान होत जातो. त्या जिल्ह्यात मला फार मोठा आनंद मिळतो. माझा उपयोग मुलांना शिकून ज्ञानी करण्याकडे होतो. त्यामुळे माझे झिजणे सत्कारणी लागते.


काही कलाकार मंडळींनी माझा आवर्जून एक छान उपयोग करून घेतला आहे. माझ्या शरीरावर टोकदार वस्तू ने करून त्याची सुंदर चित्रे तयार केली. त्यात मंदिर, देवांची मूर्ती, माणसांचे चेहरे, टेबल, खुर्ची अशा अनेक कलाकृती निर्माण केले आहेत. या कलेमुळे त्या गुणी कलाकारांना प्रसिद्धी मिळते, त्यांचे कौतुकही होते. त्यामुळे मलाही समाधान मिळते. काही लहान मुले मला हातात धरून चित्र काढतात; तर कधी कधी मला तुकडे करुन खातात ही. मला त्रास होतो मला वाया घालवतात. ज्ञानासाठी होणाऱ्या वापरामुळे मात्र माझे जीवन धन्य झाल्यासारखे वाटते. असा आहे मी खडू.