railway-sampavar-geli-tar
railway-sampavar-geli-tar

रेल्वे संपावर गेली तर मराठी निबंध | Railway Sampavar Geli Tara 

रेल्वे संपावर गेल्या, तर किती गोंधळ उडेल ? सकाळपासून रात्रीपर्यंत मोठ्या मोठ्या शहरातून वाहतुकीचे सोपे साधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या रेल्वेचे आहेत. मुंबईसारख्या शहरात तर रेल्वे हा शहराचा प्राण आहे. प्रत्येक मिनिटाला हजारो माणसाची ने-आण करणारी रेल्वे बंद पडली, तर प्रवासाचे हाल होतील. लांबच्या पल्ल्याच्या गाड्यांनी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे स्टेशनवरच अडकून पडल्याचे हाल होतील.


 प्रत्येक शहराच्या शहराशी असलेला संपर्क तुटेल. रेल्वे स्टेशनवर अडकलेल्या लोकांना प्रवासासाठी पर्याय उरणार नाही. प्रवासा पूर्वी केलेले आरक्षण वाया जाईल. त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल करावा लागेल. त्यांना पुढच्या सगळ्या संकटांना तोंड द्यावे लागेल. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांच्या प्रवासासाठी उपयुक्त असणारे रेल्वे वाहतूक खूप अवघड परिस्थिती निर्माण करेल.


 सर्व जनतेच्या होणाऱ्या हानीचा विचार केला, तर मात्र रेल्वे संपावर जाणे कुणाच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार नाही. त्यामुळे रेल्वे आपल्या रुळावरून नियमितपणे सर्वांच्या सुखासाठी धावण्याची योग्य ठरेल.