रस्त्याचे-मनोगत-मराठी-निबंध

रस्त्याचे मनोगत मराठी निबंध | Rastyache Manogat Marathi Nibandh :

मी रस्ता बोलतोय बरं का ! पूर्वी मी मातीचा बनलेला होतो. मऊ माती, लाल रंगाचा बैलगाडी, छकडी, सायकली सावकाश माझ्या अंगावरून जात होत्या. थोड्याच वर्षात जशी जशी प्रगती व्हायला लागली, तसे तसे माझे स्वरूप बदलायला सुरुवात झाली. माझ्या मातीच्या अंगावर दगड विटा मुरूम टाकण्यात आली. त्यावर उकळते डांबर वाचले आणि त्यावरून जड जड रोलर रोलर फिरवला गेला. मला खूप यातना सहन कराव्या लागल्या. नंतर मला माझ्याकडे बघून खूपच आश्चर्य वाटले. मी खूपच सुंदर, चकचकीत आणि गुळगुळीत झालो होतो.


माझ्या अंगावरून अनेक प्रकारची वाहने सुसाट वेगाने धावू लागली. थोड्या काळानंतर मात्र माझ्या अंगावरचे डांबराचे तुकडे निघायला सुरुवात झाली. डांबर, खडी निघाल्यामुळे मला खूप ठिकाणी खड्डे पडले. मी फारच ग्रुप दिसायला लागलो. वाहने माझ्या अंगावरून अडखळत जायला लागली. मला धक्के बसायला लागले. वाहनातील माणसे मलाच दोष देतात. मला होणार्‍या यातना माझी कशी आहेत कोण ऐकणार ? मी पुन्हा एकदा सुंदर, गुळगुळीत होण्याची वाट बघत आहे.