ravivarchi-sutti-nasti-tar
ravivarchi-sutti-nasti-tar

 रविवारची सुट्टी नसती तर निबंध | Ravivarchi Sutti Nasti Tar : आठवड्यामध्ये रविवार नसता तर काय बरे होईल ? आठवडा फक्त सहा दिवसाचा होईल. म्हणजे रोज फक्त कामच करावे लागेल. ' रविवार आला, आता मज्जा, आता आराम करायचा, उशिरा उठायचं, रविवारी सुट्टी असे काही म्हणता येणार नाही. सहा दिवस काम केल्यावर कामाचा शीण घालवायला रविवार नसेल, तर आपल्याला पुन्हा ताज्या दमाने काम करायला उत्साहच वाटणार नाही.  आपण  मरगळ आल्यासारखे  होऊ. कोणतेही काम करताना आपल्याला कंटाळा येईल.


 यासाठी आठवड्यामध्ये आपल्याला रविवारी सुट्टी आवश्यक आहे. रविवार आला की त्या दिवशी घरातले सगळेजण आपापल्या सोयीची रविवारची मजा घेतात आणि सोमवारी नव्या उमेदीने आणि उत्साहाने कामाला सुरुवात करतात. म्हणून रविवार हा आठवड्यातला सर्वात महत्त्वाचा वार आहे