एका-उदबत्ती-चे-मनोगत
 

एका उदबत्ती चे मनोगत | Udabatti Che Manogat Marathi Nibandh : मंदिरात, घरात, रंगमंचावर मधुर सुहास पसरवणारी मी एक उदबत्ती. माझी कहाणी तशी अगदी सोपी, साधी आहे. माझी शरीरातील नाजूक, उंचच सडपातळ. मला तयार करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. साधी सुगंधी पुड मिसळून घ्यायची, मग लांब काड्या घेऊन त्या सुगंधी पुढे मध्ये घोळवा याच्या आणि उदबत्ती वळायची. हे काम खूप कौशल्याचे असते; पण सवयीने ते कोणालाही जमू शकते.

माझ्या सुगंधाचे अनेक प्रकार आहेत. केवडा, जाई, मोगरा, चाफा, गुलाब इत्यादी प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे सुगंध निवडतो. माझ्यामुळे घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण होते. माझा सुहास देवघरात पसरला, की पवित्र भावना जागृत होते. माझा सुहास पसरवण्यासाठी मला स्वतःला अग्नी मध्ये जाळुन घ्यायला लागते. माझे एक टोक पेटवले, की सावकाश माझे शरीर जळते आणि त्यातून सुगंधी धूर बाहेर पडतो. स्वतः जळून दुसरा सुहास देण्याचे माझे काम मला खूप आवडते आणि मला त्यामध्ये पूर्ण समाधान मिळते. माझे शरीर दुसऱ्यासाठी अर्पण करतो आणि परमेश्वर चरणी विलीन करते.