विज्ञानाची प्रगती मराठी निबंध | Vidnyanachi Pragati Marathi Nibandh


विज्ञानाची प्रगती मराठी निबंध | Vidnyanachi Pragati Marathi Nibandh

विज्ञानाच्या प्रगतीने माणसाचे जीवन सुखमय झाले आहे. माहिती तंत्रज्ञानात झाली आहे, त्यात प्रामुख्याने कम्प्युटरचा वापर सगळ्यांना माहित आहे. कम्प्युटर मुळे आज जग जवळ आले आहे. कम्प्युटरच्या वापराने कामे सोपी झाली आहेत. इंटरनेटमुळे जगातील माहिती मिळवता येते. ज्ञानार्जन करण्यासाठी तिचा उपयोग होतो. जगाच्या कोणत्याही टोकाशी असणाऱ्या माणसांचे आपण त्वरित संपर्क साधू शकतो.

त्यामुळे कामाची गती पण वाढली आहे. जास्तीत जास्त मजकुर कमी जागेत साठवता येतो. कागदपत्राची अडगळ या सोयीमुळे कमी झाली आहे. ऑफिस बँक, तसेच रेल्वे, विमान सेवा याठिकाणी तिकडे काढता येणे, हे काम देखील घरात बसून करता येते. प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या कम्प्युटरच्या उपयोगामुळे वेळेचा अपव्यय न होता ते जास्तीत जास्त प्रगती पता कडे जाताना दिसत आहे.

कम्प्युटरच्या युगातील प्रगतीचा आणखीन एक पुढचा टप्पा म्हणजे कॅमेर्‍याने देशात परदेशात असणाऱ्या जिव्हाळ्याच्या माणसाची आपण घर बसल्या बघून त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलू शकतो. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता जग जवळ आले आहे.