वृक्षाचे-मनोगत-मराठी-निबंध
वृक्षाचे-मनोगत-मराठी-निबंध

वृक्षाचे मनोगत मराठी निबंध । Vruksha Che Manogat Essay In Marathi :
माणूस हा एक अतिशय दुष्ट आणि विध्वंसक प्राणी आहे, असे माझे ठाम मत आहे. मी एक उंच उंच वृक्ष आहे भरपूर सावली देणारा; पण माणसाला त्याचे काहीच कौतुक वाटत नाही. फार पूर्वीपासून मी इथे आहे. पूर्वी निसर्ग अशा बेभरवशी नव्हता, पाऊस वेळच्यावेळी पडत असे; त्यामुळे माझ्या लहान रोपट्यांचा मोठा वृक्ष होताना काहीच अडचणी आल्या नाहीत. माझी वाढ होताना मी जमिनीतून खूप द्रव्य शोषून घेतली, पाणी शोषून घेतले, जमिनीत माझे मुळे इतस्ततः पसरू लागली आणि माझ्या पायांना बळकटी आली. मी पाहू लागलो. आज माझे वय ३५ आहे. आता मी पूर्ण वृक्ष झालो आहे.

माझ्या खांद्यावर सकाळ, दुपार, संध्याकाळ पक्षी येऊन बसतात. आपली घरटी बांधतात. पिल्लांना वाढवतात. माझी मधुर फळे खातात रस्त्याने ये-जा करणारी माणसे थोडावेळ सावलीला, विश्रांतीला माझ्यापाशी येतात आणि मला टेकून बसतात. काही खोडसाळ मुले माझ्यावर उगीचच दगड मारतात. त्यामुळे मला वेदना होतात. पक्ष्यांच्या घरच्यांनाही धक्का बसतो. काही माणसे माझ्या फांद्या पण तोडून झाडायला घेऊन जातात.

परवाच तीन-चार माणसे माझ्या फांद्या पण सोडून जायला घेऊन जातात.

प्रवास तीन-चार माणसे माझी पाहणी करून गेली. त्यांच्या ऐकून बोलण्यातून मला ते इंधनासाठी तोडणार आहेत, हे समजले. मी हा विचार ऐकून खूप दुखी झालो आहे. आज पर्यंत प्रत्येकासाठी मदत करण्याचे कार्य मी करत असताना माझ्या वाटेला असे दुःख आले ? या दुष्ट लोकांना कोण सांगेल " वृक्ष वाचवा, निसर्ग वाचवा"