वृत्तपत्र-वाचनाचे-महत्त्व--मराठी-निबंध
वृत्तपत्र-वाचनाचे-महत्त्व-मराठी-निबंध

  वृत्तपत्र वाचनाचे महत्त्व  मराठी निबंध | Vrut Patrache Manogat :

रोज सकाळी चहाबरोबर पेपर वाचायला प्रत्येकाला लागतोच. आयुष्यातील अनेक सवयीप्रमाणे ही सवय प्रत्येकाला असते. वर्तमानपत्राचे वाचन आवडता छंद असतो. वर्तमान पत्राच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत चा मजकूर आपल्याला सर्व जगाची सफर घडवतो.


महत्त्वाच्या विषयावर चर्चा अग्रलेख, राजकारणाची माहिती, जागतिक घडामोडी, याबरोबर इतर स्थानिक घटनांची माहिती देखील आपल्याला वृत्तपत्राद्वारे मिळते. शहरातील नाटक सिनेमाच्या जाहिराती, सगळ्यांची ठिकाणी वेळ आपल्याला समजतात. खेळांची आवड असणाऱ्यांसाठी त्यांचे स्वतंत्र पान असते.

वर्तमानपत्रातून आपण ज्ञान संपादन करू शकतो. वैचारिक लेख, काव्य, कथा असे विभागही आठवड्यातून ठराविक दिवशी छापतात. तरुण पिढीला जसा त्यांच्या जीवनात पत्राचा आधार लागतो, तसाच म्हातारपणाचा सोबती म्हणून वयस्कर मंडळींनी वृत्तपत्र हवेसे वाटते. प्रत्येकाच्या आवडीचे हे वृत्तपत्र माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे.