![]() |
मराठी-राजभाषा-दिन-निबंध |
मराठी राजभाषा दिन निबंध । Marathi rajbhasha din nibandh marathi :- मराठी राजभाषा दिन हा दर वर्षी २७ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाला मराठी भाषा दिवस. मराठी भाषा गौरव दिन. मराठी राजभाषा दिन. मराठी भाषा दिन अशा विविध नावाने संबोधले जाते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.
"माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यांतील शिळा. हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात." कुसुमाग्रज यांच्या या ओळींनी अवघ्या मराठी जनाना अभिमान दिले आहे.
मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले म्हणूनच त्यांच्या जन्मदिवसाला हा दिन साजरा करण्यात येतो.क्रांतीचा जयजयकार, वेडात मराठे वीर दौडले सात, आगगाडी आणि जमीन, पृथ्वीचे प्रेमगीत या कुसुमाग्रजांच्या कविता आजही लोकप्रिय आहेत.
मराठी भाषा ही ९व्या शतकापासून प्रचलित आहे व तिची निर्मिती संस्कतपासून झाली आहे.महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकत राजभाषा आहे. मराठी बोलणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही भारतातील तिसरी व जगातील पंधरावी भाषा आहे. "माझा मराठीची बोलू कौतुके। | परि अमृतातेही पैजासी जिंके। | ऐसी अक्षरे रसिके। मेळविन।" असे लिहन संत ज्ञानेश्वर म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शाळा वा कॉलेज मध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात, तसेच ठिकठिकाणी मराठी नाटके, काव्य संमेलन व मराठी संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सर्वानी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, तरच मराठी राजभाषा दिन साजरा करण्याला खरा अर्थ प्राप्त होईल.
0 Comments