नमस्कार मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आज आपण निबंध लेखन कसे करावे ? Nibandh kasa lihava | Nibandh marathi याबद्दल माहिती बघणार आहोत. बरेच जण निबंधाचा विषय सांगितला तिकडे एका पुस्तकाचा आधार घेतात यात वाईट असे काहीच नाही. पण निबंधाचा लेखनाचा हेतू काय असतो ? तुमच्या मधली कल्पनाशक्ती विचार शक्ती हे विस्तृत झाली पाहिजेत म्हणून निबंध लेखनाचा स्वतः सराव करणे आवश्यक आहे. आपल्या ब्लॉगवर भरपूर निबंध प्रकाशित झाली आपण अभ्यासली सुद्धा असेल. पण नेमकं निबंध कसा लिहायचा हाच आपला विषय आहे. जेणेकरून तुम्ही स्वतःहून परीक्षेमध्ये जर एखादा नवीन विषयाला आणि त्याबद्दल तुम्हाला वेळ प्रसंगी लिखाण करण्याची गरज पडली तर तुम्ही कमी वेळात मुद्देसूदपणे लिखाण कराल याकरता आम्ही तुम्हाला निबंध लेखनाबद्दल च्या काही महत्त्वाच्या बाबी सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया.
![]() |
Nibandh-lekhan-kase-karave |
सध्याच्या गुंतागुंतीच्या जीवनात समर्थपणे आणि यशस्वीपणे जगण्यासाठी लेखनकला असणे आवश्यक आहे. लेखन कलेल्या जोरावर आपण आपल्या भावना, विचार इतरांना कळवू शकतो आपले विचार पटवून देऊ शकतो. चांगले कसे लिहावे हे विदयार्थ्यांनी शिकायला हवे . लेखनकला ही कष्टसाध्य, प्रयत्नसाध्य कला आहे . मनातले विचार मुद्देसूदपणे खेळकरपणे शब्दात मांडण्याची ही सुंदर कला जीवनभर पुरणारी शिदोरी आहे . लेखनकला हे 'येरा गवाळयाचे काम नोहे' असेच सर्वजन समजतात; परंतु ही प्रयत्नसाध्य कला आहे हे विसरून चालणार नाही . 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' हेतुपुरस्पर प्रयत्न केले गेले तर ही कला साध्य होऊ शकते . निबंधलेखन म्हणजेच दिलेल्या विषयावर सुसंगतपणे, सुवोध व आकर्षक भाषेत विचारांची मांडणी करणे . आपले विचार प्रगल्भ असावे लागतात . त्यासाठी वाचन व चिंतन हे महत्वाचे आहे . विचारलेल्या निबंध विषयावर आपल्याला खूप विचार सुचले तरी त्यातले योग्य व जरूरीचे विचार एकत्र करून त्यातले मुद्दे मनाशी ठरवून त्या मुद्दयांचे विवेचन करणे आवश्यक आसते .
निबंध लेखनाच्या कलेचा अभ्यास कसा करावा हे सांगणारे सुत्र.
वाचन, श्रवण , निरीक्षण, आणि मनन किंवा चिंतन'.
१) वाचन : विदयार्थ्यांना वाचनाची गोडी लागली पाहिजे . त्यासाठी चांगली निवडक पुस्तके वाचावीत. 'साने गुरुजींच्या गोड गोष्टी वाचा . लो टिळक, म. गांधी , पं नेहरू यांची चरित्रे ह . ना. आपटे ,नाथ माधव , रणजीत देसाई यांच्या ऐतिहासिक कादंब-या ना . सि . फडके, वि .स .खांडेकर,अनंत काणेकर यांचे लघुनिबंध शंकर पाटील , द. मा. मिरासदार यांच्या कथा वाचाव्यात. रोजची वर्तमनपत्रे , मासिके वचावीत . त्यामुळे वाचनाची आवड निर्माण होईल . केवळ गोष्टीचीच पुस्तके न वाचता त्या त्या वयोमानानुसार योग्य अशी चरित्रे वाचावीत.
वाचनाची दोन अंगे : १. मुकवाचन २. प्रकटवाचन
१. मुकवाचन : 'मुकवाचनामुळे अनेक गोष्टी साधता येतात . नवीन ज्ञान मिळवता येते . विचारशक्तीला चालना मिळते . बुद्धीला धार येते . नाविन्याची गोडी लागते वाहय जगाचा मागोवा घेता येतो .
२.प्रकटवाचन :
प्रकटवाचनामुळे कुठे थांबावे, विरामचिन्हांचा उपयोग कसा करावा, शब्दफेक कशी करावी , वाचन करतांना शब्दातून भावना कशा व्यक्त कराव्यात . या सर्व गोष्टी शिकता येतात . उच्चार , भाषाशुद्धता साधता येते. वाचन सहेतुक समजून उमजून करावयाचे असते .
२.लेखन :
'जात्यावर बसले की ओवी सुचते'. हे खरे असले तरी तयारी न करता लेखन करणे हे धाडसाचे,
अविचाराचे व हास्यास्पद ठरते . लेखनाचे टाचण किंवा टिपण तयार करणे, मुद्देसुद विचार मांडणे प्रारंभ , मध्य ,समारोप यांचा सांगोपांग विचार करणे आवश्यक आहे . लेखनाच्या सरावामुळे कल्पकतेला वाव मिळतो.
लेखनाची त्रिसुत्री १. प्रारंभ - आकर्षक प्रारंभ वाचकाचे लक्ष वेधून घेतो .
२) मध्य - वाचकाच्या मनाच्या गाभ्यात प्रवेश करतो .
३). समारोपकायमचा ठसा वाचकावर उमठवतो.
३.श्रवण : हल्ली घराघरात टी . व्ही . असतोच . त्यावर चांगले कार्यकम असतात . शालेय कार्यकम विविध नेत्यांची भाषणे, शृतिका , पु. ल. देशपांडे , व . पु. काळे , शं. ना. नवरे यांच्या कथा ऐकाव्यात उत्तम निबंधकार हा उत्तम श्रोता असावा लागतो . ' 'दिसामाजी प्रत्येकाने काहीतरी लिहित जावे वाचावे व - ऐकावे हे खरे' त्यामुळे व्यक्तिमत्व खुलते फुलते घडते .
४. निरीक्षण : 'शाळेतील लहान मोठया सहलीत भाग घ्या . निसर्ग देखावे 'डोंगर रांगा नदया आकाशातील वदलते रंग फुलांचे गंध रंग यांचे निरीक्षण करा. ' आपल्या आजुबाजुच्या माणसांचे वावरणे कुणाचा चेहरा कुणाचे हसणे बोलणे चालणे कुणाचा पोशाख रूवाब यातील वेगळेपण पहा . 'दुरदर्शनवरील कार्यकम संवाद परिषदा इ.चे बारकाईने निरीक्षण करा
५. चिंतन किवा मनन : वाचन श्रवण निरीक्षण यावर चिंतन किंवा मनन हवेच . 'नळी फुकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशी स्थिती होईल . आपण काय वाचले ? काय ऐकले ? काय पाहिले ? त्याचे स्वरूप काय ? ते आपल्याला थोडक्यात सांगता येईल का ? दोन तासांनी ते आपल्याला आठवते का? दोन आठवड्यांनी ते लक्षात राहते का?
वाचन श्रवण निरीक्षण द्वारा जो अनुभव आपण घेतला तो दोन वाक्यात ,आठ दहा वाक्यात किंवा २५ ते ३0 ओळीत लिहिता येईल का ?
उदाहरण पहा :
'संध्याकाळची वेळ होती नुकतीच शाळा सुटली होती . मुले आपल्याच नादात घरी निघाली होती . रस्त्यावर वाहनांची फेरीवाल्यांची व जाणा-या येणा-या पादचा-यांची तुडुंब गर्दी होती. त्या गर्दीतूनच अशोकचा पाय केळीच्या सालीवरून घसरला व तो धप्पदिशी पडला. त्याच्या हातातील पुस्तके वहया चारी बाजूला विखुरली गेली . अचानक तो पडल्यामुळे बाकीची मुले विचकली . काहीजण फिदीफिदी हसू लागली . मागून स्कूटरवाले व मोटारवाले येत होते . मोटार ड्रायव्हरने गाडी उजवीकडे वळवली; ती आदळली हातगाडीवर हातगाडी कलंडली. धक्का लागल्यामुळे केळी द्राक्षे, पेरू रस्त्यावर पसरली .काही फळे अशोकच्या अंगावर उडाली. अशोक उठत होता. इतक्यात बाजूच्या गल्लीतील दोन कुत्री 'भांडत भांडत रस्त्याच्या गर्दीत आली. अशोक घाबरून पुन्हा | खाली पडला'.
या प्रसंगाचे दोन ओळीत वर्णन
'केळीच्या सालीवरून अशोक पाय घसरून पडला . रस्त्यात गोंधळ उडाला . फेरीवाल्याची हातगाडी कलंडली . कुञ्यांच्या भांडणात अशोक पुन्हा खाली पडला' .
हेच वर्णन २५ ते ३० ओळीत लिहिण्यासाठी काय करावे ?
१.शहराची , रस्त्यांची तपशीलवार माहिती
२.अशोकच्या मित्रांची माहिती
३ . त्यांचे आपापसातील बोलणे
४. पादचा-यांच्या प्रतिकिया
५. लोकांची वाहणांची कोंडी तारांबाळ
६. फेरीवाला मोटार ड्रायव्हर यांचे जुंपलेले भांडण असे लिहिता येईल.
निबंध वाचणीय होण्यासाठी चित्ताकर्षक सुरवात , चटकदार शेवट व मुद्देसूद मांडण आवश्यक आहे .निबंध लेखनास सुरवात कशी करावी . शेवट कसा करावा . कोणते वर्णन आधी व कोणते वर्णन नंतर कोणते कमी कोणते जास्त या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. प्रत्यक्ष लिहावयास वसावे . हळूहळू जसे सुचेल तसे लिहावे . त्यातील चुका आपल्या आपणच शोधाव्यात .
निबंध लेखनात सापडणारे दोष .
१. शुद्धलेखन जमले नाही.
२ . सुरवात चांगली नाही.
३ . मुद्दे उलट सुलट झाले .
४. एका मुद्द्याचेच वर्णन जास्त झाले .
'५ .शेवट अर्धवट वाटतो . यासारखे दोष सापडतील चुका सुधारून पुन्हा लिहा . प्रयत्न करा म्हणजे यश मिळेल .
निबंधलेखन करताना कोणती काळजी घ्यावी ?
सुवाच्चता व शुद्धता असावी. अक्षर सुंदर असेल तर उत्तमच . यासाठी रोज पाच ओळी शुद्धलेखनाचा सराव करावा
१. लिहिताना समास सोडावा .
२ . लिहिलेले तपासून पहावे व आवश्यक तेथे सुधारावे .
३.शब्द खोडताना त्या शब्दावर काट मारून तो शब्द पुढे लिहावा शब्द गिरवू नये.
४. समतोल परिच्छेद असावेत . प्रत्येक परिच्छेदापूर्वी मुद्दयांचे नाव लिहून अधोरेखित करावे.
५. आकर्षक व नेमकी प्रस्तावना असावी
६. शब्द या शास्त्राचा तोलून-मापून वापर करावा
७. अत्युच्च बिंदू वर निबंधाचा शेवट करावा
८. पुनरावृत्ती टाळावी.
९. संदिग्धता टाळावी
१०. दुबोध, बोजड भाषा टाळावी भाषेची क्लिष्टता टाळावी.
११. आपल्याला कोणत्या प्रकारचा निबंध चांगला लिहिता येतो याचा विचार करा व विषयाची अचूक निवड करा.
१२.नेमके विचार मोजके शब्द व आकर्षक मांडणी.
१३.स्वच्छ रसाळ सोपी सहज सुंदर भाषा वापरावी
१४.आकर्षक प्रारंभ, विचारपूर्वक मध्य व प्रेरक उदबोधक शेवट करावा.
१५.व्यवहारातील पटतील असे उदाहरणे घेऊन मुद्दे स्पष्ट करा
१६.विषयाला अनुसरून पूरक पोषक मुद्दे मांडा
१७. आपला निबंध एक सुरी, एककल्ली एक रंगीन होता बहुरंगी अनेक पदरी व एकजिनसी असावा.
संपूर्ण निबंध प्रमाण वृद्ध, एकसूत्री व मुद्देसूद असावा. या उलट त्यात योग्य शब्दाचा वापर, शब्दाची अशुद्ध व अप्रचलित रुये, अशुद्ध लिखाण, वाईट हस्ताक्षर, पिका अथवा निंदा व विषयाची अपर्णा खोटी माहिती या बाबी मुलीच असू नयेत आणि सरतेशेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" हे लक्षात ठेवून निबंध लेखनास प्रारंभ करा चुकता चुकता शिकावं शिकता शिकता सर्वोच्च शिखर गाठा.
0 Comments