प्रदूषण-वर-निबंध-मराठी
प्रदूषण वर निबंध मराठी | Pradushan var nibandh in marathi :
प्रदूषण प्रदूषण हा आजच्या काळात खूप मोठा संकट आहे कारण यामुळे अनेक लोकांना आरोग्य समस्या झाल्या आहेत. अलिकडच्या वर्षात प्रदूषणाचा दर अगदी वेगाने वाढत आहे कारण औदयोगिक कचरा थेट माती, पाणी आणि हवेत मिसळत आहे. असे असूनही लोक अजूनही प्रदूषण आणि त्याच्या परिणामांना गांभीर्याने घेत नाही आहेत. या मुद्दयाला गांभीर्याने हाताळण्याची नितांत गरज आहे अन्यथा आपल्या भविष्यातील पिढयाना खप त्रास होऊ प्रदूषण बऱ्याच श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जाते जसे वायू प्रदूषण, माती प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण इत्यादि. या व्यतिरिक्तही अनेक प्रकारचे प्रदूषण आहेत ज्यामुळे पृथ्वीवरील जीवनाला हानी पोहचत आहे. वृक्षतोडी, वाहनांचा अति वापर, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे नैसर्गिक वातावरणात खूप बदल झाला आहे. हानिकारक आणि विषारी कचऱ्यामुळे माती, वायु आणि पाण्यामध्ये अपरिवर्तनीय बदल होतो व पृथ्वीवरील जीवांना त्याचे घातक परिणाम सोसावे लागतात.
प्रदूषण रोखण्यात आणि कमी करण्यात योगदान देण्याचे कर्तव्य आज प्रत्येकाचे आहे आणि हे कर्तव्य पूर्ण केल्यानंतरच आपण पुढच्या पिढ्यांना प्रदूषण मुक्त वातावरण देऊ शकतो.
1 Comments
More information plz 👍🏻🙏🏻
ReplyDelete