राजमाता जिजाऊ निबंध मराठी | Rajmata jijau marathi nibandh :
![]() |
राजमाता-जिजाऊ-निबंध-मराठी |
राजमाता जिजाऊ हिंदू धर्माचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या आदर्श राजमाता म्हणजेच जिजाबाई भोसले. त्यांना आपण जिजामाता, जिजाऊ. राजमाता, माँसाहेब अशा विविध नावांनी संबोधतो.जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी इ.स. १५९८ ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासह झाला.
जिजाऊंचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंवर होती. जिजाऊंनी शिवाजी राजे यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांनी शिवाजी राजांना महाभारत, रामायणातील गोष्टी सांगितल्या.| जिजाऊंच्या आज्ञेत शिवाजी आपल्या सवंगड्यांसोबत युद्धकला शिकले. त्यांनी शिवाजी राजांना राजकारणाचे धडे शिकवले. जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांमुळे शिवाजी राजे घडले.शिवाजी राजांच्या अनुपस्थितीत जिजाऊ राज्यकारभार पाहत असत व न्यायनिवाडे करीत असत.त्या गरजूंना मदत हि करत असत.शिवाजी राजांचे राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यावर बारा दिवसांनी म्हणजेच १७ जून इ.स. १६७४ ला जिजाऊंचे वृद्धापकाळाने निधन झाले.
1 Comments
Thanks
ReplyDelete