शेतकरी-निबंध-मराठी
शेतकरी निबंध मराठी | Shetkari nibandh marathi madhe :
भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे. आपल्या मातृभूमीसाठी अन्नधान्य पिकवणारा, धरतीला सुजलाम सुफलाम बनवणारा शेतकरी रात्रंदिवस शेतात राबत असतो. थंडी, ऊन व पाऊस हे सगळं सहन करून शेतकरी आपल्यासाठी मेहनत करत असतो. शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे आपल्याला अन्न मिळते.
शेतकऱ्याचे राहणीमान अगदी साधे असते, परंतु त्याचे जीवन खडतर असते. | तो रोज सकाळी लवकर उठून शेतावर जातो व पूर्ण दिवस शेतात काम करतो. त्याचे उत्पन्न बरेच वेळी पावसावर अवलंबून असते. कमी पाऊस किंवा अतिवृष्टी या पैकी काहीही झाले तर त्याला नुकसान सोसावे लागते. अनेकवेळा त्याला कर्जबाजारी व्हावे लागते.
आजच्या शेतीची आधुनिक पद्धती व नवीन यंत्रे शेतकऱ्यांसाठी फ्रयदेशीर ठरत आहेत. त्यांच्या सहाय्याने आजचा भारतीय शेतकरी प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे. असे असले तरीही प्रत्येक शेतकऱ्याची स्थिती चांगली व्हावी या साठी सरकारने चांगले प्रयत्न केले पाहिजेत.
0 Comments